नगर पंचायत कांद्री (कन्हान), तहसील पारशिवनी, जिल्हा नागपूर यांच्या वतीने शहर पथविक्रेता समिती (Street Vendor Committee) गठित करण्यासाठी पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम, 2014 तसेच महाराष्ट्र पथ विक्रेता नियम, 2016 अंतर्गत नामनिर्देशित सदस्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या समितीमध्ये अशासकीय संघटना / समुदाय आधारित संस्था, निवासी कल्याण संघ, व्यापारी संघ आणि पणन संघ या प्रवर्गांतील पात्र संस्थांकडून सदस्य नामनिर्देशनासाठी अर्ज स्वीकारले जातील. प्रत्येक प्रवर्गासाठी निर्धारित संख्येनुसार प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. अर्हता निकष: संबंधित क्षेत्रात सक्षम प्राधिकरणाकडे नोंदणीकृत संस्था असणे आवश्यक मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक संस्था काळ्या यादीत नसावी कोणत्याही कायदेशीर अपात्रतेत नसावी संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्षांचा अनुभव असावा इच्छुक संस्था/संघटनांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज नगर पंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. निर्धारित संख्येपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास शासन नियमांनुसार निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी DAY-NULM विभाग, नगर पंचायत कांद्री (कन्हान) येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. मुख्याधिकारी तथा अध्यक्ष, शहर पथविक्रेता समिती नगर पंचायत कांद्री (कन्हान)